अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे स्फोट होऊन जहाजाच्या काही भागाला आग लागली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी असल्याने भारतीय नौदलाने त्यांच्या सुरक्षेसाठी आपले जहाज पाठविले आहे.तर, हा ड्रोन हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण दलाने केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हल्ला झालेल्या या ‘एमव्ही केम प्लूटो’ या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता आणि ते इस्रायलशी संलग्न होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे जहाज ९ डिसेंबर रोजी कच्चे तेल घेऊन सौदी अरेबियातून कर्नाटकमधील मंगळूर बंदराच्या दिशेने निघाले होते. २५ डिसेंबरपर्यंत हे जहाज मंगळूर येथे पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, गुजरातमधील वेरावळच्या नैऋत्येला २०० किलोमीटर आणि पोरबंदर किनाऱ्यापासून २१७ सागरी मैल अंतरावर समुद्रात या जहाजावर हवाई हल्ला झाला. हा हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. “२०२१ पासून व्यावसायिक शिपिंगवरील हा सातवा इराणी हल्ला आहे”, असंही अमेरिकेच्या संरक्षण दलाने म्हटलं आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

हेही वाचा >> भारताजवळ अरबी समुद्रात इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीय नागरिक सुखरुप

गाझा पट्टीवर सध्या इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या हल्ल्याला विरोध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतात येणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले होते. याच हुथी बंडखोरांनी तांबडा समुद्रात अनेक जहाजांचे नुकसान केले आहे.

भारताची तत्काळ मदत

अरबी समुद्रात ड्रोन हल्ला करण्यात आलेल्या जहाजाच्या मदतीला भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने आपल्या युद्धनौका पाठवल्या. या व्यापारी जहाजावर २० भारतीय नागरिक असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या वतीने देण्यात आली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस मुरमुगाव काल रात्री (२३ डिसेंबर) एमव्ही केम प्लुटोवर पोहोचली. हल्ल्याचा तपशील भारतीय नौदलाकडून घेतला जात आहे. भारतीय नौदल आता या जहाजावर हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन लांब पल्ल्यातून सोडण्यात आले होते की जवळच्या जहाजातून हे तपासत आहे. ज्या भागात हल्ला झाला त्या भागात कार्यरत जहाजांचीही तपासणी केली जात आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिली.

Story img Loader