इराणमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इराणी चित्रपट दिग्दर्शक बबाक खोर्रामदीन याची त्याच्या आई वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. लग्न न केल्याच्या कारणामुळे त्याची निर्दयीपणे हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून बॅगेत भरले होते. या प्रकरणी त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे.

४७ वर्षीय बबाब खोर्रामदीन याने २००९ साली तेहरान विद्यापीठातून चित्रपट निर्मिती पदवी घेतली होती. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी बबाक लंडनमध्ये गेला होता. त्यानंतर इराणमध्ये परतल्यानंतर तो विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचे धडे देण्याचं काम करू लागला. या दरम्यान त्याने अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. कुटुंबियांपासून लांब जात त्याने चित्रपट क्षेत्रावरच लक्ष केंद्रीत केलं. मात्र या दरम्यान त्याचे वडील आणि त्याच्यात लग्नाबाबत वाद होत होते. घटनेच्या दिवशी बबाक आणि वडिलांचं कडक्याचं भांडण झालं. तेव्हा रागाच्या भरात वडिलांनी त्याला भूल दिली आणि त्याची हत्या केली. एवढंच नाही तर गुन्हा लपवण्यासाठी त्याच्या शरीराचे तुकडे करून बॅगेत भरले. मात्र पोलिसांना या खुनाचा सुगावा लागला आणि त्यांनी आई वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.

स्पुटनिक लसीचे दोन डोस व २४ दिवसांची रशियावारी फक्त सव्वा लाखात

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. इराणमध्ये ऑनर किलिंगचे हा पहिला प्रकार नसल्याचं इराण आंतरराष्ट्रीय टीव्हीचे विश्लेषक आणि संपादक जेसन ब्रॉडस्की यांनी सांगितले आहे. करोना काळात कौटुंबिक हिंसाचार आणि हत्यांमध्ये वाढ झाल्याचही त्यांनी सांगितलं.

Story img Loader