परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली. इराकच्या काही भागात तणाव निवळला असून, या भागातील तब्बल १०,००० भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारकडून लवकरच व्यवस्था केली जाईल. या नागरिकांची सुरक्षा आणि सुटका करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात, याबद्दलसुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतात परतण्याची इच्छा असेलल्या नागरिकांच्या परतीची व्यवस्था करण्यासाठी, इराकमध्ये तीन ठिकाणी भारतातर्फे छावणी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील राजदूतांची बैठक
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली.
First published on: 29-06-2014 at 06:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iraq crisis swaraj chairs meeting of gulf envoys