इराकच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडील भागांत तीन मोटारीत ठेवलेल्या बॉम्बचे स्फोट होऊन किमान ३९ जण ठार झाले आहेत. नव्याने घडविण्यात आलेल्या या स्फोटांमुळे हिंसाचाराचा उद्रेक अद्याप शांत झालेला नसल्याचे सूचित होत आहे.
हल्लेखोरांनी प्रथम बाजारपेठेकडे जाणाऱ्यांवर हल्ले चढविले आणि त्यानंतर आपला मोर्चा पोलीस गस्तीपथकांकडे वळविला. त्यामुळे पोलिसांना इराकच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडील भागांमधील महत्त्वाचे रस्ते बंद करावे लागले आणि तेथे संचारबंदी जारी करावी लागली. सदर परिसर हा सुन्नी घुसखोरांचा बालेकिल्ला आहे.
शियापंथीय सरकारच्या निषेधार्थ देशातील सुन्नीपंथीय अबर अल्पसंख्याकांनी भीषण रक्तपात घडविला आहे. शेजारच्या सीरियामध्ये परदेशी सैनिक मोठय़ा प्रमाणावर येत असल्याने यादवी युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader