मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी जगभरातील मुस्लीम धर्मीय सौदी अरेबियामध्ये येतात. मात्र सध्या इराकी-कुर्दीश वंशाचे ब्रिटीश नागरिक अॅडम मोहम्मद यांची खास चर्चा होत आहे. हज यात्रेसाठी त्यांनी तब्बल ६५०० किमी पदयात्रा केली आहे. एकूण १० महिने २५ दिवस प्रवास करुन ते मक्का येथे पोहोचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> …म्हणून आठ वर्षांचा चिमुकला आपल्या दोन वर्षीय भावाच्या मृतदेहासोबत बसून राहिला

सौदी अरेबियातील मक्का येथे पोहोचण्यासाठी मोहम्मद यांनी तब्बल ६५०० किमीचा पायी प्रवास केला आहे. त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, सर्बिया, टर्की, लेबॉनन, जॉर्डन अशा देशांतून प्रवास केला. त्यांनी आपल्या प्रवासाला १ ऑगस्ट २०२१ रोजी सुरुवात केली होती. मागील महिन्यात ते सौदी अरेबियात पोहोचले. त्यांच्या या जिद्दीचे आणि तसेच पायी प्रवास करण्यामागील उद्देशाचे कौतूक केले जात आहे.

हेही वाचा >> ‘टकटक टोळी’च्या म्होरक्याला तमिळनाडूत अटक; दोनशेहून अधिक ‘सीसीटीव्हीं’च्या चित्रणाची तपासणी

अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी आपल्या यात्रेदरम्यान रोज साधारण १७.८ किलोमीटरचा प्रवास केला. तसेच या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत ३०० किलो वजन असलेले त्यांचे सामान होते. शांतता तसेच समानतेचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाटी त्यांनी ही यात्रा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर GoFundMe नावाचे एक पेज तयार केले आहे. या पेजच्या माध्यमातून ते आपल्या प्रवासाबद्दल माहिती देत होते. मोहम्मद आपल्या प्रवासादरम्यान टीकटॉकवर यात्रेसंबंधी व्हिडीओज पोस्ट करायचे. या प्रवासादरम्यान त्याचे साधारण पाच लाख फॉलोअर्स झाले आहेत.

हेही वाचा >> श्रीलंकेच्या अध्यक्षीय प्रासादात आंदोलकांचे ठाण; राजपक्षे, विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यावर निदर्शक ठाम

“प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी हे केलं नाही.मात्र धर्म, जात, वंश तसेच रंग या बाबीचा गौण असून आपण सगळे मानव आहोत; इस्लामने शिकवलेली शांतता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी मी पायी प्रवास केला,” असे अॅडम मोहम्मद यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती देताना सांगितले.

हेही वाचा >> “देशावर काली मातेचा आशीर्वाद”; ‘काली’ पोस्टर वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

दरम्यान, मीना येथे पोहोचताच सौदी अरेबियातील माध्यम कार्यवाहक मंत्री माजिद बिन अब्दुल्ला अल-कसाबी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच हज यात्रेसाठी मोहम्मद यांची पुढील व्यवस्था करुन दिली. दोन वर्षांनंतर सौदी अरेबियमध्ये १० लाख मुस्लीम धर्मियांना हज यात्रेसाठी येण्यास परवानगी देण्यात आली आहे. २०२० आणि २०२१ साली हज यात्रा फक्त सौदी अरेबियातील नागरिकांपर्यंतच मर्यादित होती. या वर्षी ७ जुलैपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे.