‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षित करणे आता महागले आहे. ‘आयआरसीटीसी’ने तिकीट आरक्षणावरील सेवाशुल्कात दुप्पटीने वाढ केल्यामुळे प्रवाशांना त्याचा भार सोसावा लागणार आहे. आतापर्यंत स्लीपर वर्गासाठी १० आणि वातानुकूलित वर्गासाठी २० रुपये सेवाशुल्क आयआरसीटीसी आकारत होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. एप्रिलपासून स्लीपर वर्गासाठी २० रुपये तर वातानुकूलित वर्गासाठी ४० रुपये सेवाशुल्क मोजावे लागते आहे.
रेल्वे मंडळाच्या परवानगीनंतर आयआरसीटीसीने तिकीट आरक्षण सेवाशुल्कात वाढ केली. यामुळे आयआरसीटीसीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
‘आयआरसीटीसी’कडून रेल्वे तिकीट सेवाशुल्कात दुप्पट वाढ
'आयआरसीटीसी'च्या माध्यमातून रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षित करणे आता महागले आहे.
First published on: 17-04-2015 at 11:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc increased railway ticket service charges