रेल्वे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगमागे मोठी बचत करणं आता शक्य होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेने भागीदारीत बुधवारी एक को- ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कार्डला आयआरसीटीसी – एचडीएफसी बँक ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे नवं ट्रॅव्हल को ब्रँडेड कार्ड एकाच प्रकारात उपलब्ध असणार आहे. पण ते केवळ एनपीसीआयच्या रुपे नेटवर्कवर आधारित असणार आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने आयआरसीटीसीसोबत ट्रॅव्हल कार्डसाठी करार केला होता. यानंतर आयआरसीटीसीचा हा तिसरा करार आहे.

या ट्रॅव्हल कार्डद्वारे प्रवाशांना विशेष फायदे आणि सेवा सुविधा मिळणार आहेत. यात आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंग वेबसाइटवरून आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅपद्वारे बुक केलेल्या रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर जास्तीत जास्त बचतीच्या सुविधा मिळणार आहे. अशी माहिती एचडीएफसी बँकेचे समूह प्रमुख (पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि IT) पराग राव यांनी दिली आहे.

याव्यतिरिक्त आयआरसीटीसी- एचडीएफसी (IRCTC HDFC) बँक क्रेडिट कार्डधारकांना आकर्षक जॉइनिंग बोनस, बुकिंगवर सूट आणि देशभरातील रेल्वे स्थानकांवर असलेल्या एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये पोहचण्याची सुविधाही दिली जाईल.

यावर IRCTC ने म्हटले की, सह-ब्रँडेड कार्ड बहुतेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर नव्याने सुरु झालेल्या लाउंजमध्ये विशेष सेवा देणार आहे. प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी या दोन आघाडीच्या ब्रँडने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सर्वश्रेष्ठ इन क्लास रिवॉर्ड्स प्रोग्रॉम आणि आयआरसीटीसीच्या सेवांचा आनंद मिळेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc partners with hdfc bank to launch co branded travel credit card key features sjr