IRCTC Website Down : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइटवर आज पुन्हा एकदा डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर नवे वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटनाला गेलेल्या आणि जाण्याचे नियोजन करत असलेल्या प्रवाशांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान ही समस्या सकाळी १० च्या सुमारास सुरू झाल्याचे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. गेल्या आठवड्यातही आयआरसीटीसीच्या सर्व्हरमध्ये असाच बिघाड झाला होता. सर्व्हर बंद झाल्यामुळे देशभरातील असंख्य प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान आयआरसीटीसी वेबसाइट डाऊन होण्याची ही महिन्यातील तिसरी वेळ आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी इतर पर्याय

आयआरसीटीसी रेल कनेक्ट ॲप

गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून IRCTC Rail Connect ॲप डाउनलोड करा. यानंतर तुम्हाला ट्रेन शोधण्यासाठी आणि थेट तिकिटे बुक करण्यासाठी याचा वापर करता येईल.

अधिकृत तिकीट एजंट

आयआरसीटीसीची वेबसाइट डाऊन झाल्याने, प्रवाशांना अधिकृत तिकीट एजंट किंवा ट्रॅव्हल एजन्सीकडून तिकीट बुक करता येते.

ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म

रेल्वे प्रवाशांना पे टीएम, मेक माय ट्रीप, कन्फर्म टीकेटी, किंवा रेड बससारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही रेल्वे तिकीट बुक करता येईल.

हे ही वाचा : मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नाला नकार, तरुणाने जिलेटिन कांडीचा स्फोट करत स्वत:ला उडवले

प्रवाशांचा संताप

दरम्यान आज आयआरसीटीसीची वेबसाइट क्रॅश झाल्यानंतर प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या क्रॅशचा सर्वाधिक फटका तत्काळ तिकिटे बुक करणाऱ्यांना बसला आहे. कारण तत्काळ तिकिट प्रस्थानाच्या एक दिवस आधी बुक करता येते. पण आयआरसीटीसी साइट डाऊन झाल्याने उद्या प्रवसाचे नियोजन असलेल्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.

हे ही वाचा : लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन; ‘किल मोदी पॉलिटिक्स’ अशी घोषणाबाजी

एकीकडे रेल्वे संतप्त प्रवाशी सोशल मीडियावर त्यांची नाराजी व्यक्त करत असताना, आयआरसीटीसीने आद्याप याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. आयआरसीटीसी वेबसाइटवर सातत्याने येत असलेल्या या व्यत्ययांमुळे अनेक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत आहे. यापूर्वी गुरुवारी (26 डिसेंबर) रोजीही भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट डाऊन झाली होती.

Live Updates

Story img Loader