Ironman 70.3 Goa Event: भारतीय जनता पक्षाचे बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपल्या नावावर एक महत्वाचा विक्रम केला आहे. तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केला आहे. त्यामुळे आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण करणारे ते देशातील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत. गोव्यात रविवारी आयर्नमॅन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खासदार तेजस्वी सूर्या यांनी सहभाग घेत एक खास विक्रम केला आहे. तेजस्वी सूर्या यांनी ही स्पर्धा पूर्ण करत केलेल्या विक्रमाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत तेजस्वी सूर्या यांच्या फिटनेसचेही कौतुक केले आहे.

तेजस्वी सूर्या यांनी गोव्यात आयर्नमॅन स्पर्धेचं चॅलेंज पूर्ण केलं. या स्पर्धेमध्ये २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग करणे आणि २१ किमी धावण्याचा समावेश आहे. तेजस्वी सूर्या यांनी हे संपूर्ण आव्हान फक्त ८ तास, २७ मिनिटं आणि ३२ सेकंदात पूर्ण केलं आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा खासदार तेजस्वी सूर्या यांनी प्रतिक्रिया देत नंतर आनंद व्यक्त केला आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “आयर्नमॅन स्पर्धेचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी खूप कठोर मेहनत घेतली.” दरम्यान, आयर्नमॅन (Ironman 70.3 Goa Event) या स्पर्धेमध्ये देशातील ५० पेक्षा अधिक जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, तेजस्वी सूर्या यांनी ही स्पर्धा यशस्वी पूर्ण करत विक्रम केला आहे.

हेही वाचा : ‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपल्या नावावर एक विक्रम करत आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत कौतुकास्पद कामगिरी असं म्हणत कौतुक केलं आहे. तसेच खासदार तेजस्वी सूर्या यांच्या फिटनेसचे पंतप्रधान मोदीही झाले कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “कौतुकास्पद कामगिरी! मला खात्री आहे की, यामुळे देशातील तरुण फिटनेस बाबत सजग होतील. अनेक तरुणांना या माध्यमातून प्रेरणा मिळेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलं आहे.