S. Jaishankar on Global Democracy : “जागतिक स्तरावर लोकशाही धोक्यात आहे, या मताशी मी सहमत नाही, असं म्हणत लोकशाहीला पाश्चात्य वैशिष्ट्य मानण्यावरून देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टीका केली. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर, अमेरिकन सिनेटर एलिसा स्लॉटकिन आणि वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्क यांच्यासमवेत म्युनिक सुरक्षा परिषदेत ‘लाइव्ह टू व्होट अनदर डे: फोर्टिफायिंग डेमोक्रॅटिक रेझिलियन्स’ या विषयावरील पॅनेल चर्चेदरम्यान बोलताना जयशंकर बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या लोकशाहीला अधोरेखित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाश्चात्य लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या विचारांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मला वाटते की मी निराशावादी पॅनेलमध्ये आशावादी आहे. मी माझे बोट वर करून सुरुवात करेन. माझ्या नखावर तुम्हाला दिसणारे हे चिन्ह, नुकतेच मतदान केलेल्या व्यक्तीचे चिन्ह आहे. आमच्या राज्यात (दिल्ली) नुकतीच निवडणूक झाली. गेल्या वर्षी, आमची राष्ट्रीय निवडणूक झाली. भारतीय निवडणुकीत, पात्र मतदारांपैकी सुमारे दोन तृतीयांश मतदान करतात. राष्ट्रीय निवडणुकीत, सुमारे ९० कोटी मतदारांपैकी, सुमारे ७० कोटी मतदान करतात. आम्ही एकाच दिवसात मते मोजतो.”

लोकशाहीबाबत आपण आशावादी

आधुनिक युगात आपण मतदान सुरू केले तेव्हापासून आज दशकांपूर्वीच्या तुलनेत २० टक्के जास्त लोक मतदान करतात. तर, पहिला संदेश असा आहे की जागतिक स्तरावर जगभरात लोकशाही अडचणीत असल्याच्या मताशी मी असहमत आहे. म्हणजे, सध्या आपण चांगले जगत आहोत. आपण चांगले मतदान करत आहोत. आपल्या लोकशाहीच्या दिशेबद्दल आपण आशावादी आहोत आणि आपल्यासाठी लोकशाही प्रत्यक्षात पोहोचली आहे”, असे ते पुढे म्हणाले. त्यांनी असेही म्हटले की निकाल जाहीर झाल्यानंतर “कोणीही त्यावर वाद घालत नाही”.

लोकशाही तुमच्या टेबलावर अन्न ठेवत नाही, असं पॅनेलवरील सिनेटर स्लॉटकिन म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले, “भारतात लोकशाही असल्याने आम्ही ८० कोटी लोकांना पोषण आणि अन्न देतो.