भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर किटाळ आलेले असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना क्लीन चिट देण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी टीका केली आहे. संघाचे नेते गुरुमूर्ती म्हणजे भाजपचे महालेखापाल (कॅग) आहेत काय असा तिरकस सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
चेन्नईनजीकच्या उपनगरात संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची कारणमिमांसा करण्यात आली तसेच त्यानंतर त्यांना क्लीन चिटही देण्यात आली. गुरुमूर्ती यांनी गडकरी यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य आढळत नसल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी टीका केली आहे. गुरुमूर्ती म्हणजे भाजपचे महालेखापाल आहेत काय असा सवाल उपस्थित करून गडकरी अध्यक्षपदी कायम राहिल्यास त्याच पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader