HMPV Virus In China : चीनमध्ये सध्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अशात या विषाणूचा भारताला कोणताही धोका नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. “चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा (HMPV) उद्रेक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. देशात असे कोणतेही प्रकरण आढळले नाही. त्यामुळे सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे भारताला काळजी करण्यासारखे काही नाही”, असे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी म्हटले आहे.

घाबरण्याचे कारण नाही

डॉ. अतुल गोयल पुढे म्हणाले की, “चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमो व्हायरसच्या उद्रेकाबद्दल बातम्या येत आहेत. त्याबद्दल मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, मेटाप्न्यूमो व्हायरस हा इतर श्वसन विषाणूंसारखा आहे. सर्दी हे याचे सामान्य लक्षण आहे. माझे नागरिकांना आवाहन आहे की, आपण खोकला आणि सर्दी असणाऱ्यांच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे. खोकताना आणि शिंकण्यासाठी एक वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा आणि जेव्हा सर्दी किंवा ताप असेल तेव्हा आवश्यक असलेली सामान्य औषधे घ्या. सध्याच्या चीनमधील परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.”

Trump tariffs impact against china canada and mexico
चीन, कॅनडा, मेक्सिकोविरुद्ध ट्रम्प यांचे ‘टॅरिफ युद्ध’ सुरू! पुढचा नंबर ‘ब्रिक्स’ आणि भारताचा?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
China is making huge fusion research facility
अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी चीनने तयार केले संशोधन केंद्र? याचा अर्थ काय? या घडामोडीमुळे भारतावर काय परिणाम?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत येणारे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल देखील श्वसन आणि हंगामी संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशीही संपर्क साधल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

कोविडमुळे झाले होते लाखो मृत्यू

चीनमधील नवीन श्वसन रोगाच्या प्रसारामुळे जगभरात पुन्हा एक कोविड सारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये मध्य चीनच्या वुहान शहरात कोविडचा पहिला रुग्ण सापडला होता. कोविड महामारीने जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला होता. याचबरोबर जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच एक निवेदन प्रकाशित करत, चीनने HMPV विषाणूबाबत अधिक माहिती पुरवणे त्यांचे नैतिक आणि वैज्ञानिक कर्तव्य असलयाचे म्हटले होते.

हे ही वाचा : Jill Biden : जो बायडेन यांच्या पत्नीला का वापरता येणार नाही पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्वात महागडी भेटवस्तू, जाणून घ्या नेमकं कारण

‘एचएमपीव्ही’ची लक्षणे

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, एचएमपीव्हीमुळे सर्व वयोगटातील लोकांना आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना श्वसन रोग होऊ शकतात. एचएमपीव्ही, संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून खोकताना आणि शिंकताना इतरांपर्यंत पसरण्याची शक्यता असते. खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेताना धाप लागणे ही या रोगाची सामान्य लक्षणे आहेत.

Story img Loader