ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर म्हणजे त्यांची खानदानी संपत्ती वाटते काय, असा खडा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी विचारला आहे. जम्मू-काश्मीरसाठी घटनेत विशेष तरतूद असलेल्या कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात राम माधव यांनी उडी घेतली असून, थेट ओमर अब्दुल्लांवर हल्लाबोल केला.
एकतर जम्मू-काश्मीर भारताचा घटक नाही किंवा या राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० कायम राहील, अशा आशयाचे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. त्याला उत्तर देताना राम माधव म्हणाले, जम्मू-काश्मीर भारताचा घटक नाही? ओमर अब्दुल्लांना ती त्यांची खानदानी संपत्ती वाटते काय? कलम ३७० असू दे किंवा नसू दे जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे आणि कायमच राहील.
‘ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर खानदानी संपत्ती वाटते काय?’
ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर म्हणजे त्यांची खानदानी संपत्ती वाटते काय, असा खडा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी विचारला आहे.
First published on: 28-05-2014 at 02:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is jammu and kashmir omar abdullahs parental estate