करोना आणि हार्ट अटॅक यांचं काही कनेक्शन आहे का? करोनाला दोन वर्षे होऊन गेली आहेत तरीही लोकांच्या मनात हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलं आहे. त्यांनी या प्रश्नाचं दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. करोनाची लाट संपली आहे. मात्र करोनाची चौथी लाट येऊ शकते अशीही शक्यता आहे. कारण करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. अशात
काय म्हटलं आहे मनसुख मांडविया यांनी?
करोना व्हायरस हा सातत्याने त्याचं रूप बदलणारा व्हायरस आहे. त्याचे विविध उपप्रकार आल्याचं आपण पाहिलं आहे. भारतात करोनाचे २१४ प्रकार आढळले आहेत. आम्ही आता करोनाची चौथी लाट जर आली तर त्यासाठीही सज्ज आहोत. ऑक्सिजनची व्यवस्था, आयसीयू बेड तसंच इतर महत्त्वाच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. करोना आणि हार्ट अटॅक यांचं काही कनेक्शन आहे का? यासाठी आम्ही आमच्या पातळीवर संशोधन करतो आहोत. त्याचा अहवाल पुढच्या दोन ते तीन आठवड्यात येईल असंही मांडविया यांनी सांगितलं.
अनेक कलाकार, खेळाडू यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मनसुख मांडविया पुढे म्हणाल की, करोना काळानंतरही आपण पाहिलं की अनेक अॅथलिट, तरूण कलाकार, खेळाडू यांचा मृत्यू परफॉर्मन्स देत असताना झाल्याचं आपण पाहिलं, वाचलं. त्यामुळे हा रिसर्च करायचं ठरवलं की करोना आणि हार्ट अटॅक यांचा परस्पर काही संबंध आहे का? या संदर्भातला अहवाल लवकरच येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
चौथ्या लाटेबद्दल काय म्हणाले आरोग्यमंत्री?
करोनाची चौथ्या लाटेच्या शक्यतेवरही मनसुख मांडविया यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की “आपल्याला या लाटेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. मागच्या वेळी कोविड म्युटेशन ओमिक्रॉन चा बीएफ ७ हा सब व्हेरिएंट होता. आता XBB 1.16 या व्हेरिएंटमुळे करोनाचे रूग्ण वाढत आहेत. हा सब व्हेरिएंट खूप जास्त धोकादायक नाही. मात्र आपल्याला सगळ्यांनाच एका जबाबदारीने सतर्क रहावं लागणार आहे” असंही मनसुख मांडविया यांनी सांगितलं.