Church Fire : महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यावरुन विरोधक वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या पुतळ्यांची उदाहरण देत आहेत. या घटना इथे घडत असताना फ्रान्समध्ये दोन महायुद्ध पाहिलेल्या चर्चला आग ( Church Fire ) लागली आहे. ज्याबाबत आता टेस्ला आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. हे चर्च जळत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आगीमुळे चर्चची ( Church Fire ) बेल खाली कोसळली आहे. एलॉन मस्क यांनी या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

नेमकी काय घटना घडली?

फ्रान्सच्या सेंट ओमर मध्ये असलेलं १६५ वर्षांपासून उभं असलेलं चर्च जळालं ( Church Fire ) आहे. अग्निशमन दलाच्या ९० कर्मचाऱ्यांनी पाच तास अथक मेहनत करुन या चर्चला लागलेली आग नियंत्रणात आणली आहे. या चर्चला आग ( Church Fire ) का लागली ते समजू शकलेलं नाही. मात्र हे चर्च १८५४ मध्ये बांधण्यात आलं होतं. २०१८ मध्ये या चर्चचं नुतनीकरण करण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
massive fire breaks out at bamboo godown in vasai
कामणच्या बेलकडी येथे बांबूच्या गोदामाला भीषण आग; वसईत अवघ्या तीन तासात दुसरी आग दुर्घटना
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक

एलॉन मस्क यांनी काय म्हटलं आहे?

टेस्लाचे प्रमुख आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी या प्रकरणी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. १८५४ मध्ये हे चर्च बांधण्यात आलं होतं. या चर्चने दोन महायुद्धं पाहिली आहेत या चर्चला आग कशी लागली? ही घटना काय घडली? ही घटना म्हणजे अपघातच आहे की घातपात? असा प्रश्न एलॉन मस्क यांनी उपस्थित केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. AFP च्या वृत्तानुसार सेंट ओमर या ठिकाणी असलेल्या या चर्चला सोमवारी सकाळी ४.३० च्या सुमारास आग लागली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ९० जवानांनी प्रचंड मेहनतीने ही आग नियंत्रणात आणली. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

व्हिडीओत काय दिसतं आहे?

या घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणताना दिसत आहेत. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader