IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरुन सुरु झालेला वाद ताजा असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यूपीएससी (UPSC) ची परीक्षा देऊन त्यानंतर दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देऊन त्या कोट्याचा चुकीचा वापर करुन अधिकारी झाल्याचा आरोप प्रफुल देसाईंवर आहे. प्रफुल देसाई यांनी दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आरोप होण्याआधी ते घोडेस्वारी करताना दिसले. त्यावेळी त्यांनी मी माझं आयुष्य जगू नको का? असा सवाल केला आहे.

प्रफुल देसाई का चर्चेत आले?

२०१९ च्या UPSC परीक्षेत ५३२ वा नंबर आलेले प्रफुल देसाई यांच्या विरोधातले हे आरोप प्रकाशात येण्यासाठी त्यांची घोडेस्वारीच कारणीभूत ठरली. प्रफुल देसाई यांनी घोडेस्वारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर त्यांच्या दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्राचा वाद निर्माण झाला. देसाई हे सध्या करीमनगरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देसाई यांनी यूपीएससीच्या परीक्षेत ओएच ऑर्थोपेडिकली हँडीकॅप्ड कोट्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

जिल्हाधिकारी देसाई यांनी आरोप फेटाळले

याबाबत देसाई यांना विचारलं असता त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, ” माझा एक पाय अधू आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की मी शारिरीक कसरतींमध्ये सहभागी होऊ शकत नाही. माझ्या ट्रेनिंग दरम्यानही अशा काही कसरती झाल्या ज्यामध्ये मी भाग घेतला होता. इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार त्यांच्या डाव्या पायात ४५ टक्के अधूपणा आहे. देसाई म्हणाले माझ्या एका पायाला पोलिओ झाला होता. त्यामुळे मी धावू शकत नाही, मात्र चालू शकतो, सायकलही चालवतो. मी नॉर्मल आयुष्य जगू नको का? असाही सवाल त्यांनी केला आहे.”

हे पण वाचा- ‘या’ कारणांमुळे आयएएस पूजा खेडकर चर्चेत, व्हायरल व्हिडिओमुळे आईला अटक तर वडील फरार; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

प्रफुल देसाईंचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये देसाई टेनिस कोर्टवर आपल्या मित्रांसह सेल्फी घेताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत देहरादून या ठिकाणी सायकल चालवताना दिसत आहेत. सोशल मीडियावरच्या एका फोटोत देसाई हे ऋषीकेश येथील नदीमध्ये राफ्टिंग करताना आणि घोडेस्वारी करताना दिसत आहेत.

Praful Desai Photo
आता करीमनगरचे अधिकारी प्रफुल देसाई वादात अडकले आहेत. (फोटो-प्रफुल देसाई इंस्टाग्राम)

देसाई यांच्यावर सोशल मीडियावर टीका

देसाईंचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विविध युजर्सच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. UPSC मध्ये किती ताकद आणि जादुई शक्ती आहे, जे सनदी अधिकारी दिव्यांग होते ते आता रिव्हर राफ्टिंग आणि घोडेस्वारी करत आहेत. AIIMS चा प्रचार करण्यापेक्षा आता UPSC चा केला पाहिजे कारण तेच खरं रुग्णालय आहे अशी खोचक टीका करण्यात आली आहे.

व्हायरल फोटोंबाबत देसाईंचं स्पष्टीकरण

देसाई यांचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यावर ते म्हणाले, “मी नियमितपणे बॅडमिंटन खेळत नाही. माझे काही मित्र आहेत ज्यांच्यासह मी कधी कधी खेळायला जातो. दिव्यांग असल्याचा अर्थ हा नाही की माझा पाय निकामी झाला आणि मुळीच चालू शकत नाही. मी मित्रांसह थोडं खेळण्याची प्रॅक्टीस करतो. डिसेंबर २०२० मध्ये ट्रेकला गेलो होतो, तेव्हा तिथे सायकल चालवली. मी मसुरीतून केम्प्टी फॉल्सपर्यंत सायकलने आलो पण मी पूर्ण प्रवास सायकलने केला नाही.” असं स्पष्टीकरण दिलं आहे.

Story img Loader