ठाण्याच्या एका तरुणीने बंगळुरूत इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणीने आत्महत्या करण्याआधी गुगलवर आत्महत्या कशी करावी? असे सर्च करून तिने एकूण ८९ संकेतस्थळांवरून माहिती घेतल्याचे तिच्या फोन रेकॉर्डवरून समोर आले आहे.
व्यवसायाने फॅशन डिझाईनर असलेल्या इशा हांडा(२६) या तरुणीने बंगळुरूत टॅक्सी भाड्याने घेऊन प्रवासादरम्यान शहरातील सर्वात उंच इमारतीचा गुगलवर शोध घेतला. त्यानंतर ‘शोभा क्लासिक’ या १३ मजली इमारतीची निवड करून तिने या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून इशाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, इशाच्या बॅगमध्ये ड्रग्ज देखील आढळून आले आहेत. त्यामुळे ती ड्रग्ज घेत असावी आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इशाचे बारावीपर्यंतच शिक्षण ठाण्यात झाले होते. त्यानंतर तिने पुण्यातून अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला होता.
‘आत्महत्या कशी करावी?’ गुगलवर सर्च करून ठाण्यातील तरुणीची आत्महत्या
ठाण्याच्या एका तरुणीने बंगळुरूत इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणीने आत्महत्या करण्याआधी गुगलवर आत्महत्या कशी करावी?
आणखी वाचा
First published on: 02-09-2015 at 04:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha searched for ways to commit suicide