इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री प्रफुल पटेल यांची चौकशी केली. सीबीआयमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत अडथळे निर्माण करण्यासाठी काय करता येईल, हे ठरविण्यासाठी गुजरातचे विधी राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये कथित बैठक घेतली होती. या बैठकीला पटेलही उपस्थित होते. यासंदर्भात त्यांची गांधीनगरमध्ये चौकशी करण्यात आली. त्याबैठकीमधील भाषणांचे रेकॉर्डिंग दोन पेन ड्राईव्हच्या माध्यमातून निलंबित आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांनी सीबीआयकडे दिले आहे. त्यावरून पटेल यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. सिंघल स्वतःदेखील त्या बैठकीला उपस्थित होते. सिंघल यांच्याविरुद्ध योग्य वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
इशरत जहॉं चकमक: प्रफुल पटेल यांची सीबीआय चौकशी
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री प्रफुल पटेल यांची चौकशी केली.
First published on: 24-09-2013 at 03:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat case cbi grills former guj minister praful patel