इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलीस महासंचालक (गुन्हे) पी. पी. पांडे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी सीबीआयला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
पांडे हे बनावट चकमक प्रकरणातील एक मुख्य आरोपी असून त्यांना स्थानिक न्यायालयाने फरार घोषित केले आहे. पांडे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आम्हाला मदत करा, अशी विनंती दोन दिवसांपूर्वी सीबीआयने आम्हाला केली. त्यानंतर आम्ही सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून सहकार्य करण्याचे आदेश दिले, असे गुजरात पोलीस प्रमुख अमिताभ पाठक यांनी सांगितले.
सर्व ठिकाणी दक्षता वाढवा आणि पांडे दिसल्यास कायद्याला अनुसरून कारवाई करा, असे पत्रात म्हटले आहे. पांडे एप्रिल महिन्यापासून फरार आहेत. काही दिवसांपूर्वी ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र न्यायालयात हजर होण्यापासून सूट द्यावी आणि अटकपूर्व जामीन द्यावा या मागण्या फेटाळण्यात आल्यापासून ते बेपत्ता झाले आहेत.
माजी पोलीस महासंचालकांना शोधण्यासाठी सीबीआयला सहकार्य करा !
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलीस महासंचालक (गुन्हे) पी. पी. पांडे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी सीबीआयला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश
First published on: 10-08-2013 at 05:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat case gujarat dgp asks state police to trace pandey