इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणाशी गुप्तचर विभागाचे (आयबी) विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचा संबंध असल्याचे पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक रणजित सिन्हा यांनी स्पष्ट केले. इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात राजेंद्र कुमार यांचे नाव आरोपी म्हणून घालण्यात आल्याने देशातील दोन उच्चस्तरिय तपास यंत्रणांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पहिल्यांदा दिले होते.
आयबीचे संचालक एस. ए. इब्राहिम यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात थेट पंतप्रधान कार्यालयाकडे आक्षेप नोंदविला. सीबीआय आणि आयबीमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी गुरुवारी गृह विभागाचे सचिव आर. के. सिंग यांनी या दोन्ही तपास यंत्रणांच्या प्रमुखांना चर्चेसाठी बोलावले होते. राजेंद्र कुमार यांची मंगळवारी चौकशी करण्यात येईल आणि त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे सीबीआयच्या संचालकांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. राजेंद्र कुमार यांच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळेच त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर सिन्हा यांनी पत्रकारांनी सांगितले.
इशरत जहॉं आणि इतर चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आणि त्याचे नियोजन करण्यात राजेंद्र कुमार यांचा संबंध होता, अशी माहितीही सीबीआयने दिलीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा