प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी इशरत जहाँ प्रकरणाची पुनर्तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले. सिन्हा यांनी बुधवारी ट्विटरवरून यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी इशरत जहाँ प्रकरणाची पुनर्तपासणी करायला हवी. “प्रभावी माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेल्या दुहेरी भूमिकेचे आरोप तपासायला हवेत. जे या प्रकरणात सहभागी नाहीत त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे याप्रकरणाची पुर्नतपासणी करून ‘दूध का दूध पानी का पानी होना जरूरी है’, असे सिन्हा यांनी म्हटले.
इशरत जहाँ चकमक प्रकरणात मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.व्ही.एस. मणी यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दुसऱ्यांदा बनविण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर माझ्याकडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.व्ही.एस. मणी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा