गुजरातमधील इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी गुरुवारी गुजरातमधील आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांना अटक केली. २००४ मध्ये अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱयांनी बनावट चकमक रचून इशरत जहॉंची हत्या केल्याचा आरोप आहे.
सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघल यांना अहमदाबादमध्येच अटक करण्यात आली आणि त्यांच्या घरी व कार्यालयांवर छापे टाकून तपास करण्यात आला.
बनावट चकमक घडवून आणण्यात सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप सीबीआयने प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) ठेवला आहे. अहमदाबाद ते गांधीनगर रस्त्यावर इशरत जहॉं हिच्यासोबत जावेद शेख, झिशान जोहर, अमजर अली राणा यांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २००४ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. जहॉं हिच्या आईने ही संपूर्ण चकमक बनावट असल्याची तक्रार गुजरात उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय दिला. याच पथकाने केलेल्या तपासात ही चकमक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी आयपीएस अधिकारी सिंघल यांना अटक
गुजरातमधील इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी गुरुवारी गुजरातमधील आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांना अटक केली.
First published on: 21-02-2013 at 05:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat jahan encounter cbi arrests gujarat police officer