इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी विशेष न्यायालयाने गुजरातमधील निलंबित अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांना जामीन मंजूर केला. या खटल्यात अटक करण्यात आलेले पांडे हे पोलीस दलातील सर्वोच्च अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरापासून ते कारागृहात होते. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.
इशरत चकमकप्रकरणी अमित शहा निर्दोष
५० हजार रुपयांच्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यांवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर न्यायालयाने त्यांचा पासपोर्टही जप्त केला आहे. या खटल्यात एका आरोपीला विशेष कारणांशिवाय जामीन मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.२००४ मध्ये इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांची चकमकीत हत्या करण्यात आली, त्यावेळी पांडे हे अहमदाबादमधील गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त होते.
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी पोलीस अधिकारी पांडे यांना जामीन
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी विशेष न्यायालयाने गुजरातमधील निलंबित अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांना जामीन मंजूर केला.
First published on: 05-02-2015 at 01:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat jahan fake encounter case gujarats suspended adgp pandey gets bail