इशरत जहाँ हिच्या कथित एन्काऊंटरप्रकरणी गुजरातमधील आणखी एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. गांधीनगर येथील विशेष पथकातील पोलीस निरीक्षक भारत पटेल यास शनिवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. पटेल याच्या बरोबरच बडतर्फ पोलीस उपअधीक्षक तरुण बारोट यालाही शनिवारी अटक करण्यात आली. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्या दोघांनाही २४ तारखेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अमजदली अकबरली, इशरत जहाँ, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्ले आणि झिशान जोहर यांना पटेल यांनी घटनास्थळी आणल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे.

Story img Loader