इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांना गुजरात पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा ठपका सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ठेवला. या आरोपपत्रात गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचेही नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आले आहे.
गुजरात पोलिसांनी २००४ मध्ये केलेल्या कारवाईत इशरत जहॉं आणि तिच्या तीन मित्रांची दहशतवादी म्हणून अहमदाबादजवळ चकमकीत हत्या केली होती. याप्रकरणी विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीमध्ये ही चकमक बनावट असल्याची माहिती पुढे आली होती. सीबीआयच्या अहमदाबादमधील विशेष न्यायालयात बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
इशरत जहॉं, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि झिशन जोहर यांची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सीबीआयनेच या खटल्याचा तपास केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा