एकीकडे अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याच्या तयारीत असताना पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय मात्र तेथील तालिबानी अतिरेकी संघटनांना मदत करण्यात पुन्हा एकदा गुंतली आहे, असा आरोप दक्षिण आशियाई घटनांचे तज्ज्ञ अभ्यासक आणि सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रीडल यांनी केला आहे. तसेच आयएसआय-पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्या सीमेत प्रवेश करायचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानचे नेतृत्व कट्टर जिहादी लष्करशहाच्या हाती जाईल, असा दावा काही वर्षांपूर्वी नवाझ शरीफ यांनी आपल्याजवळ केला होता, असा गौप्यस्फोटही रीडल यांनी केला.
पाकिस्तानच्या सरकारची नाडी ज्यांच्या हाती आहे, अशी पाकिस्तानी गुप्तचर संघटना – आयएसआय गेली २० वर्षे अफगाणी तालिबान्यांना पाठिंबा देण्यात गुंतली आहे, असे परखड मत ब्रूस रिडल यांनी व्यक्त केले.
तालिबान्यांना एक संरक्षक कवच पुरविण्यापासून, शस्त्र-अद्ययावत तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन आणि अन्य सहकार्य देण्यापर्यंत सर्वच बाबतीत आयएसआय आघाडीवर होती. किंबहुना, अमेरिकेला खूश करण्यासाठी आपण तालिबान्यांविरोधात आहोत असा आभास निर्माण करीत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तत्कालीन अध्यक्ष बुश यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप ब्रूस रिडल यांनी केला.पाकिस्तानचे अफगाणविषयक धोरण हे त्यांचे सरकार नाही तर लष्कर ठरवते हे गुपित आपल्याला १९९८ साली तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सांगितले होते, अशी आठवणही रीडल यांनी सांगितली. पाकिस्तानच्या अशा भूमिकांमुळेच भारताला तेथे महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल.
आयएसआयची तालिबान्यांना मदत सुरूच
एकीकडे अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याच्या तयारीत असताना पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय मात्र तेथील तालिबानी अतिरेकी संघटनांना मदत करण्यात पुन्हा एकदा गुंतली आहे, असा आरोप दक्षिण आशियाई घटनांचे तज्ज्ञ अभ्यासक आणि सीआयएचे माजी अधिकारी ब्रूस रीडल यांनी केला आहे.
First published on: 07-06-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isi engaged in helping taliban again bruce riedel