अत्यंत धोकादायक अशा इसिस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मंगळवारी केली. बंगळुरू येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बिस्वास हा कर्मचारी ‘ट्विटर’च्या माध्यमातून या संघटनेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे पहिले पाऊल उचलण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. इसिसने जगाच्या अनेक भागांमध्ये हातपाय पसरून विघातक कारवाया करण्यास सुरुवात करताच त्याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने या संघटनेवर बंदी घातली.

Story img Loader