इसिसच्या अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेला जॉर्डनचा वैमानिक मुताह अल कसाबेह याची जाळून हत्या केली व आता जॉर्डनने त्या घटनेचा सूड उगवण्याचा इशारा दिला असून, इसिसला भूमी हादरवून टाकणारा प्रतिसाद यामुळे दिला जाईल असे म्हटले आहे.जॉर्डनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आता जॉर्डनमधील तुरुंगात असलेली इराकी महिला व इतर सगळय़ा कैद्यांना फाशी देऊ. जॉर्डनच्या वैमानिकाचे विमान गेल्या डिसेंबरमध्ये सीरियात कोसळले होते व त्यानंतर इसिसच्या अतिरेक्यांनी त्याला ओलिस ठेवले होते त्याच्या मृत्यूची व्हिडिओ जारी करण्यात आली असून, जाळून टाकण्यापूर्वी त्याला एका काळय़ा िपजऱ्यात डांबले होते. जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी ती दृश्यफीत खरी असल्याचे सांगितले आहे.अमेरिकी आघाडीच्या वतीने लढताना जॉर्डनने सीरियावर हवाई हल्ले केले असून, आता तर इसिसला निर्णायक व हादरवून टाकणारा प्रतिसाद मिळेल असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा