ISIS आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतातून तरुणांना भरती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेला मोहम्मद शफी अरमार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात काही दिवसांपूर्वी मारला गेला. अमेरिकी ड्रोन विमानांनी सीरियामध्ये केलेल्या कारवाईत शफी मारला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शफी हा युसूफ या नावाने सुद्धा ओळखला जायचा.
‘आयसिस’च्या म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याचा निकटवर्तीय म्हणून शफी ओळखला जात होता. त्याच्याकडे संघटनेसाठी भारतातून तरुणांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने सुमारे ३० तरुणांना भरती केल्याची माहितीही मिळाली होती. ‘आयसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाकडे निघालेल्या तरुणांना ‘एनआयए’सह देशातील विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील प्रत्येक राज्यामध्ये ‘आयसिस’चे केंद्र सुरू करण्याची योजना शफीने आखली होती. शफी हा मुळचा कर्नाटकातील भटकळचा राहणारा होता. त्याचा मोठा भाऊ सुलतान अरमार हा देखील गेल्यावर्षी मार्च महिन्यात याच पद्धतीने मारला गेला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा