इसिसने पाकिस्तानकडून वर्षभरात अण्वस्त्र विकत घेण्याचे ठरवले आहे, ते आमच्या ताब्यात आल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही, इतकी आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असा दावा संघटनेच्या ‘दबिक’ या प्रचार मासिकात करण्य़ात आला आहे. या संघटनेच्या हाती अण्वस्त्रे पडली तर जगासाठी ती धोकादायक बाब ठरणार आहे.
इसिसने आता आधुनिक जगातील सर्वात स्फोटक जिहादी गट म्हणून मान्यता मिळवली आहे व केवळ १२ महिन्यांतच तो आणखी स्फोटक होईल. छायाचित्रपत्रकार कँटली यांना या गटाने ओलिस ठेवले आहे. ते अनेक व्हिडिओंमध्ये दिसतात व त्या व्हिडिओ यू टय़ूबवर आहेत. त्या मालिकेचे नाव ‘लेंड मी युवर इयर्स’ असे आहे.
परफेक्ट स्टॉर्म या लेखात म्हटले आहे की, बोको हरमसारख्या इस्लामी गटांनी इसिसशी दोस्ती केली आहे व मध्य पूर्व, आफ्रिका, आशियात संघटनेला बळकट केले आहे. अमेरिका व इराणचे रणगाडे, अग्निबाण प्रक्षेपक व क्षेपणास्त्र प्रणाली व विमान विरोधी यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. सध्या इसिसकडे अण्वस्त्रे नाहीत, पण ती मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा