‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या मलेशियातील केंद्राला इसिसकडून धमक्यांची पत्रे आली आहेत, असे रविशंकर यांच्या निकटवर्तीयांनी येथे सांगितले.
रविशंकर हे सध्या पूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी ते मलेशियात आले. काही दिवसांपूर्वी ते कंबोडियात असताना आम्हाला इसिसकडून धमक्यांची पत्रे आली, असे रविशंकर यांचे सहकारी नकुल यांनी सांगितले.
आपण आपला कार्यक्रम असाच सुरू ठेवला तर त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या पत्रांद्वारे इसिसने दिली आहे. आम्ही संबंधितांकडे याबाबत दाद मागितली आहे. भारतीय दूतावासाशीही संपर्क साधण्यात आला आहे, आम्ही तपासही सुरू केला आहे, असे नकुल यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर केंद्राभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सरकारनेही याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

Story img Loader