अनेक ओलिसांना जाहीरपणे फाशी देऊन त्याचा व्हिडिओ जारी करणाऱ्या जिहादी जॉनवर अमेरिकी लष्कराने गुरुवारी सीरियात हवाई हल्ले केले असून तो ड्रोन हल्ल्यात ठार झाला असे बातम्यात म्हटले आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते पीटर कुक यांनी सांगितले की, जिहादी जॉन म्हणून ओळख असलेला ब्रिटनचा कुख्यात अतिरेकी महंमद इमवाझी हा मारला गेला की नाही हे ठामपणे सांगता येणार नाही. रात्री केलेल्या कारवाईचा तपशील अजून हाती आलेला नाही पण जिहादी जॉनला मारण्याचा आमचा इरादा होता. १२ नोव्हेंबर २०१५ रोजी सीरियातील राका येथे हा हवाई हल्ला करण्यात आला. एनवाझी हा ब्रिटिश नागरिक असून त्याने स्टीव्हन सॉटलॉफ व जेम्ल फोली, अमेरिकी मदत कार्यकर्ता अब्दुल अहमद कासिग, ब्रिटिश कार्यकत्रे डेव्हीड हेन्स व अ‍ॅलन हेिनग, जपानी पत्रकार केन्जी गोटो या ओलिसांना फाशी देतानाच्या चित्रफिती इंटरनेटवर टाकून जगाचा थरकाप उडवला होता. इमवाझी हा लंडनचा संगणक आज्ञावलीकर्ता असून त्याचा जन्म कुवेत येथे झाला. तो इराकी कुटुंबातील आहे. त्याचे आईवडील १९९३ मध्ये ब्रिटनला आले कारण कुवेतने त्यांना नागरिकत्व दिले नव्हते.
पेंटॅगॉनने जिहादी जॉन ठार झाला किंवा नाही याची चाचपणी सुरू ठेवली असून १० डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधानांच्या कार्यालयानेही शहानिशा सुरू ठेवली असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader