अमेरिकी संस्थेच्या अहवालातील माहिती
दी इस्लामिक स्टेट टेरर ग्रुप म्हणजे आयसिसचा २०१५ मध्ये जगाला मोठा धोका होता व आजही आहे. परदेशी दहशतवाद्यांचा मोठा भरणा या संघटनेत असून इराक व सीरियात त्यांनी मोठा भाग पादाक्रांत केला, पण आता त्यांचा जोर ओसरत आहे असे अमेरिकेच्या वार्षिक दहशतवादविरोधी अहवालात म्हटले आहे. आयसिसची क्षमता व इराक-सीरियातील बळकावलेला प्रदेश दोन्ही जास्तच होते. आयसिसला इराक व सीरियात मेनंतर जास्त मोठा विजय मिळाला नाही . २०१५ च्या अखेरीस आयसिसच्या ताब्यातील ४० टक्के भूभाग मुक्त करण्यात आला. सीरियात स्थानिक दलांनी आयसिसच्या दहशतवाद्यांना महत्त्वाच्या शहरातून हाकलवले त्यात रक्का व मोसूल यांना जोडणाऱ्या भागाचा समावेश होता. एकूण आयसिसच्या ताब्यातील ११ टक्के भाग हिसकावण्यात आला. असे असले तरी अजूनही आयसिसचा अजूनही जागतिक पातळीवर दबदबा असून आयसिसने इराक व सीरियातील भाग गमावल्याने त्यांची आर्थिक क्षमता खूपच कमी झाली. त्यांनी तेथे खंडणी गोळा करणे, लोकांवर कर लादणे, तेलाची तस्करी, अपहरण करून खंडणी, किमती वस्तूंच्या चोऱ्या यातून पैसा गोळा करण्यात ते आधी यशस्वी झाले पण नंतर हा ओघ आटत गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा