फ्रान्समध्ये आजपासून सुरू होत असलेल्या युरो-२०१६ फुटबॉल स्पर्धेवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया(आयसिस) ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा सतर्कतेचा इशारा आंतरराष्ट्रीय लग्झमबर्ग फोरमने दिला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱया युरो चषकाचे सामने ११ जुलैपर्यंत रंगणार आहेत. फ्रांन्समधील विविध शहरांत हे एकूण ५१ सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान, आयसिसचे दहशतवादी घातपात घडवून आणू शकतात असा इशारा लग्झमबर्ग फोरमने दिला आहे. याशिवाय, अणुहल्ल्याचा सर्वाधिक धोका युरोपला असल्याचेही फोरमने नमूद केले आहे. त्यामुळे युरोपमधील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर स्पर्धेच्या सर्व ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Story img Loader