इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गेल्या काही आठवडय़ांत प्रतिहल्ले सुरू केलेल्या ज्या अनबर प्रांतात जोरदार आक्रमण करून इराकी सैन्याने ‘इसिस’च्या शेकडो जिहादींचे बळी घेतले असून, या प्रांताचा काही भाग परत मिळवला असल्याचा दावा या सैन्याच्या एका वरिष्ठ कमांडरने केला आहे.
इराकी वायुसेना, लष्करी हेलिकॉप्टर्स आणि युतीतील देशांच्या हवाई हल्ल्यांच्या मदतीने गेल्या काही दिवसांत आम्ही २५० हून अधिक जिहादींना ठार मारले आहे. युतीराष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांना आमच्या सैन्याला आगेकूच करण्यासाठी संरक्षक छत्र पुरवले, असे लेफ्टनंट जनरल अब्दुल आमीर यांनी सांगितले.

Story img Loader