अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हाईट हाऊसमध्ये घुरून शिरच्छेद करू, अशी धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया(इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. इतकेच नाही तर, ओबामांचा शिरच्छेद केल्यानंतर अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करू, असेही इसिसच्या दहशतवाद्यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.
इसिसच्या दहशतवाद्यांनी एका कुर्दिश जवानाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. यामध्ये शिरच्छेद करणारा ‘इसिस’चा दहशतवादी ओबामा यांचेही अशाच प्रकारे शिरच्छेद करण्याची धमकी देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. आम्ही एक दिवस नक्की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचू आणि सर्वप्रथम ओबामांचा शिरच्छेद करू अशी धमकी या व्हिडिओत तोंडाला कापड गुंडाळलेले तीन दहशतवाद्यांनी दिली. त्यानंतर घुडग्यावर बसलेल्या कुर्दिश जवानाचा क्रूररित्या शिरच्छेद करताना हे दहशतवादी व्हिडिओत दिसतात.

Story img Loader