केरळमधून गेल्या मे महिन्यात आपल्या पत्नीसमवेत अफगाणिस्तानातील नानगरहर येथे खलिफतमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झालेल्या बेस्टिन व्हिन्सण्ट ऊर्फ याहिया याने पाठविलेल्या अनेक संदेशांमधून तेथील विदारक स्थितीचे वर्णन समोर आले आहे. नानगरहर येथे अनेक भारतीय कुटुंब आहेत, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना एकत्र यऊ दिले जात नाही अथवा एकत्र काम करूही दिले जात नाही, असे व्हिन्सण्ट यांनी पाठविलेल्या संदेशांमधून स्पष्ट होत आहे. जेवणात प्रामुख्याने रोटी तर गेट-टुगेदरच्या वेळी ग्रीन टी देण्यात येत असल्याचे त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व भारतीय सातत्याने एकमेकांना भेटत आहेत, मात्र किती भारतीय आहेत ते आपण सांगू शकत नाही, त्यांच्यावर र्निबध आहेत, त्या सर्वाना इस्लाम कायद्यानुसार वागावे लागते, कोणी त्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्याला शिक्षा ठोठावली जाते, असे व्हिन्सण्ट याने लिहिले आहे.

याहियाच्या वडिलांना शनिवारी पलक्कड येथे त्यांच्या मुलाबद्दल माहिती मिळाली, केरळमधून जे २१ जण आयसिसमध्ये ISIS सहभागी होण्यासाठी गेले होते ते अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यांत ठार झाले. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जे लोक चिथावणी देत आहेत त्यांची एनआयएकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती आपल्याला आहे हे याहियाने संदेशात मान्य केले. याहिया हा मूळचा ख्रिश्चन असून त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र धर्मातर करण्यात त्यांचा काहीच हात नसल्याचे त्याने म्हटले आहे.

झाकीर नाईक याच्या आयआरएफचा कर्मचारी आरशी कुरेशी याच्याबद्दल याहियाने लिहिले आहे की, कुरेशी आपल्या निकट होता, आपणच त्याला जिहाद आणि आयसिसची माहिती दिली, मात्र त्याने आपल्याशी कधीही त्याबाबत चर्चा केली नाही, असे याहियाने म्हटले आहे.