‘इस्लामिक स्टेट’चे जाहीर समर्थन करणारे ट्विटर खाते चालविणारा मेहदी मेहबूब बिस्वास हा बंगळुरू येथून हे खाते चालवत असावा, अशी ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी वर्तवलेली शक्यता भारतीय गुप्तचर खात्याने फेटाळली आहे. प्राथमिक तपासणीअंती ‘महदी’ हा जिहादी बंगळुरूत नसावा असा कयास खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रिटिश प्रसारमाध्यमांच्या दाव्यानुसार, संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत होती. मात्र भारतीय गुप्तचर खात्याने हा दावा फेटाळून लावला आहे. @रँं्रेह्र३ल्ली२२ हे ट्विटर हँडल ‘मेहदी मेहबूब बिस्वास’ या खोटय़ा नावाने चालविले जात होते. मात्र इस्लामिक राज्याचा प्रचार करण्यात या ट्विटर खात्याचा महत्त्वाचा वाटा होता, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही, असे खात्याने स्पष्ट केले आहे.
सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. हे खाते एका व्यक्तीकडून हाताळले जात होते की त्यामागे अनेक व्यक्ती अथवा एखादी संस्थाच कार्यरत होती याचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात असलेला मुंबईस्थित आरीफ माजीद याने चौकशीदरम्यान आपण या ट्विटरवरील मजकूर वाचून प्रभावित झालो होत, अशी कबुली दिली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा