सीरियामध्ये कार्यरत असलेल्या ब्रिटिश सामाजिक कार्यकर्त्यांचा इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने शिरच्छेद केल्याने ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ‘‘दहशतवाद्यांचे हे कृत्य ‘राक्षसी’ असून याचा मी निषेध व्यक्त करतो. माझ्या सत्तेत या अन्यायी कृत्याला ठेचून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ असे कॅमेरून म्हणाले.
४४ वर्षीय डेव्हिड हेन्स या सामाजिक कार्यकर्त्यांचे २०१३मध्ये सीरियामध्ये अपहरण करण्यात आले होते. आयएसच्या दहशतवाद्यांनी दोन अमेरिकी पत्रकारांसह या कार्यकर्त्यांचाही शिरच्छेद केल्याचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. या अडीच मिनिटांच्या व्हिडीओमध्ये जिहादींशी युद्ध पुकारणे आणि इराकवर हवाई हल्ले करण्यात अमेरिकेला कॅमेरून यांची साथ आहे, असे म्हटले आहे.
हेन्स यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी ब्रिटन सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. हेन्स यांनी दहशतवादाला सामोरे जाऊन असाधारण साहस दाखविले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे कॅमेरून म्हणाले.
 या व्हिडीओमध्ये हेन्स यांचा वेश परिधान करून एक व्यक्ती ‘माझे नाव डेव्हिड हेन्स. माझा लवकरच शिरच्छेद होणार असून, डेव्हिड कॅमेरून हेच माझ्य मृत्यूला जबाबदार आहेत,’ असे बोलत असल्याचे चित्रण आहे.

Story img Loader