पीटीआय, ढाका, कोलकाता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशच्या ढाका जिल्ह्यातील इस्कॉनच्या केंद्रामधील मंदिराला शनिवारी पहाटे जमावाने आग लावल्याची माहिती इस्कॉन बांगलादेशने दिली. हे मंदिर आपल्या भाविकाच्या कुटुंबाचे होते असे बांगलादेशातील इस्कॉनकडून सांगण्यात आले तर इस्कॉन नामहट्टा केंद्राला लक्ष्य केल्याचे इस्कॉनच्या कोलकात्यामधील कार्यालयाने सांगितले.

ढाका जिल्ह्याच्या तुराग पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या धौर गावात ही घटना घडल्याचे इस्कॉनने सांगितले. तेथील पोलीस ठाण्याने माहिती दिली की, या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. इस्कॉन बांगलादेशचे सरचिटणीस चारु चंद्र दास ब्रह्मचारी यांनी सांगितले की, मंदिराचे छत उचकटून टाकल्यानंतर त्याला आग लावण्यात आली. ‘‘ही आग लगेचच विझवण्यात आली पण त्यातील मूर्तीचे नुकसान झाले आणि पडदे जळाले,’’ असे त्यांनी म्हटले आहे. तर इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी सांगितले की, जमावाने नामहट्टा केंद्रातील मंदिरामध्ये मूर्तींची जाळपोळ केली. ‘‘बांगलादेशातील इस्कॉन नामहट्टा केंद्र जाळून टाकले.. श्री श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि मंदिरातील सर्व वस्तू पूर्णपणे जळून गेल्या.’’

हेही वाचा >>>Hyderabad : चोरांचा प्रताप, रुग्णवाहिका चोरली अन् बचावासाठी लढवली अनोखी शक्कल; पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग

दास यांनी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टनुसार, समाजकंटकांनी श्री श्री राधाकृष्ण मंदिर आणि श्री श्री महाभाग्य लक्ष्मीनारायण मंदिराला आग लावली. मंदिराचे छत उचकटून पेट्रोल किंवा ऑक्टेन वापरून जाळपोळ केल्याचे दास यांनी लिहिले आहे.

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जम्मू काश्मिरातील डोडा जिल्ह्यातील भद्रवाह शहरात आंदोलन करण्यात आले. सनातन धर्म सभेने आयोजित केलेल्या आंदोलनात भाजप आणि विश्व हिंदू परिषदेसह अन्य हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iskcon center set on fire in bangladesh amy