बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये गुरुवारी ISKCON मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढाक्याील वारी परिसरातल्या लाल मोहन साहा रोडवर इस्कॉनचं राधाकांत मंदिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी या मंदिरात अचानक काही लोकांचा जमाव दाखल झाला आणि त्यांनी मंदिराच्या काही भागाचं नुकसान केलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार या घटनेमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामध्ये सुमांत्रा चंद्र श्रावण, निहार हलदर, राजीव भद्र अशी काही जखमींची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेमध्ये मंदिराच्या काही भागाची तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अधिक सविस्तर तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.

या घटनेमध्ये मंदिराच्या काही भागाची तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अधिक सविस्तर तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.