पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अल कादिर ट्रस्ट केसमध्ये इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. हा जामीन काही अटींवर आणि शर्थींवर मंजूर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इम्रान खान यांना तातडीने तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश दिले होते. इम्रान खान यांची अटक अवैध आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता आज इस्लामाबाद न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. PTI च्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातले आदेश दिल्यानंतर इम्रान खान यांना पोलीस लाइन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं. इम्रान खान यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

अल कादिर ट्रस्ट प्रकरण नेमके काय आहे?

इम्रान खान यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यादेखील आरोपी आहेत. अल कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणात त्यांची नॅशल अकाउंटॅबिलीटी ब्यूरोकडून (एनएबी) चौकशी केली जात आहे. इम्रान खान तसेच त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी बाहरिया टाउन (इस्लामाबाद येथील रियल इस्टेट कंपनी) या कंपनीला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांत संरक्षण देण्यासाठी ५ अब्ज रुपये आणि जमीन घेतली आहे, असा एनएबीने आरोप केलेला आहे.

पाकिस्तानचे तब्बल १९० दशलक्ष पौंडचे नुकसान?

एनएबीने केलेल्या आरोपांनुसार अल कादिर या संस्थेच्या मार्फत इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ही रक्कम देण्यात आली. अल कादीर या संस्थेचे इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी हे दोनच विश्वस्त आहेत. तत्कालीन पीटीआय सरकार आणि बाहरिया टाऊन कंपनीमध्ये जो करार झाला, त्यामुळे पाकिस्तानच्या तिजोराली तब्बल १९० दशलक्ष पौंडचे नुकसान झालेले आहे.