‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने आगामी काळात भारतामध्ये आपल्या जिहादी लढ्याचा विस्तार करण्याची शपथ घेतली आहे. ‘आयसिस’कडून जारी करण्यात आलेल्या वचननाम्यात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करून निर्णायक लढ्याच्या दिशेने वाटचाल करताना जगात इस्लामी सत्तेच्या पायाभरणीसाठी जागतिक युद्ध छेडण्याचा इशाराही यानिमित्ताने आयसिसकडून देण्यात आला. ‘आयसिस’ने आता इराक आणि सीरीयाबाहेर विस्तार केला पाहिजे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि अन्य देशांमध्ये जिहादी चळवळ विस्तारण्याचे ‘आयसिस’चे मनसुबे वचननाम्यातून जाहीर करण्यात आले.
या वचननाम्याच्या निमित्ताने ‘आयसिस’कडून पहिल्यांदाच भारतातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. भारतामध्ये हिंदू चळवळ जोमाने वाढत असून हे लोक गोमांस खाणाऱ्या मुस्लिमांना मारत आहेत. या संघटनांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांचा उद्देश मुस्लिमांविषयी द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढविणे हा असून या माध्यमातून भविष्यातील युद्धासाठी मनुष्यबळाची पायाभरणी सुरू असल्याचे ‘आयसिस’च्या वचननाम्यात म्हटले आहे. या वचननाम्यात नरेंद्र मोदींचा उल्लेख हिंदू राष्ट्रवादी असा करण्यात आला आहे. ते शस्त्रास्त्रांचे पूजक असून ते त्यांच्या लोकांना भविष्यातील मुस्लिमांविरुद्धच्या लढ्यासाठी तयार करत आहेत. आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आणि सशस्त्र सेनेची उभारणी करण्यासाठी त्यांच्याकडे राजकीय पक्ष आहे. याद्वारे त्यांना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असलेल्या मुस्लिमांविरुद्ध दहशतवादी मोहीम सुरू करता येईल, असे ‘आयसिस’च्या पुस्तिकेत म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा