काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी राहुल गांधी आरूढ होणार, या धाटणीच्या बातम्या गेल्या अनेक वर्षांपासून केवळ ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसला या बातम्या ऐकून अजूनही कंटाळा आला नाही का, असा सवाल उपस्थित करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाच्या वृत्तांचा समाचार घेतला. प्रसारमाध्यमांत राहुल यांच्या राज्याभिषेकाच्या बातम्या पेरण्यापेक्षा काँग्रेसने लगेचच त्यांना पक्षाध्यक्ष करावे आणि त्यांच्याकडे पक्षाची धुरा द्यावी, असा सल्लाही ओमर अब्दुल्ला दिला आहे.
राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याबाबत सोनियांचे मौन
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी राहुल गांधी पक्षाध्यक्ष होणार असल्याच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. या वृत्तांचा ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून समाचार घेतला. दरम्यान, भाजपनेही या वृत्तांचा आधार घेत काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसविणे हे घराणेशाहीचे बोलके उदाहरण असल्याचे भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काल म्हटले होते. सोनिया गांधी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांना ‘शहेनशहा’ म्हणून संबोधले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने सोनिया गांधी यांच्या ‘शहजाद्या’च्या डोक्यावर पक्षाध्यक्षपदाचा मुकूट ठेवणे, हे ‘शहेशहानियत’चे (घराणेशाहीचे) बोलके उदाहरण असल्याची टीका केली होती.
‘राहुल गांधींना काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी बसवणे हे घराणेशाहीचे बोलके उदाहरण’