Israel Air Strike on Gaza News : गाझाच्या खान युनिस येथे इस्रायलने हल्ला केला असून यामध्ये किमान ७१ जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक नागरिक जखमी असल्याचे वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हमास संचलित गाझा सरकारने या हल्ल्याचे वर्णन मोठा नरसंहार असे केले असून मृतांमध्ये नागरी आपत्कालीन सेवा सदस्यांचा समावेश आहे.

या (Israel Air Strike on Gaza)भीषण हल्ल्यात नागरी आपत्कालीन सेवाच्या सदस्यांच्या १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत, असं हमाससंचालित गाझा सरकारी मिडिया कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. तर, हमासचा लष्करी शाखा प्रमुख मोहम्मद देईफला इस्रायलने सैन्याने लक्ष्य केलं होतं, असंही इस्रायल सैन्याने म्हटलं आहे. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, हमासचा आणखी एक महत्त्वाचा अधिकारी राफा सलामा यांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं होतं.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…

Read More on Israel Air Strike on Gaza >> विश्लेषण : पश्चिम आशियात आता इस्रायल-हेजबोला संघर्ष? दोन आघाड्यांवर लढणे इस्रायलला शक्य होईल?

दक्षिण इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि इस्रायल-हमास युद्धाची सुरुवात करणारा मोहम्मद देईफ हा अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादी होता. त्यातच आज इस्रायलकडून (Israel Air Strike on Gaza) हल्ला करण्यात आला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयानुसार अनेक जखमी आणि मृतांना जवळच्या नासेर रुग्णालयात नेण्यात आले आहे.

वरिष्ठ कमांडर लक्ष्यित

इस्रायली सैन्याने या हल्ल्याबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, जिथे दोन वरीष्ठ हमास कमांडर लपले होते तिथेच हल्ला (Israel Air Strike on Gaza) केला आहे. हवाई हल्ल्याचे ठिकाण झाडे, अनेक इमारती आणि शेड यांनी वेढलेले एक खुले क्षेत्र होते.” हमासने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायली लढाऊ विमाने, तोफखाना आणि ड्रोनने विस्थापित लोकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात निर्दोष आणि असुरक्षित नागरीक मारले गेले आहेत.

हा (Israel Air Strike on Gaza) हल्ला पूर्वनियोजित हल्ला असल्याचंही म्हटलं जातंय. तसंच, या ठिकाणी हल्ला होणार असल्याची सूचना मे महिन्यापासून दिली जात होती. अखेर, इस्रायलने हल्ला केला. तसंच, इस्रायलला केला जात असलेला शस्त्रपुरवठा थांबवावा, असं आवाहन युके सरकारलही करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर २०२३ पासून या हल्ल्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत हजारो नागरिकांचे जीव गेले आहेत.

Story img Loader