Israeli military carried out multiple airstrikes on Hezbollah’s central headquarters : इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हेजबोलाच्या मुख्यालयावर आणखी एक प्राणघातक हवाई हल्ला केला. सूत्रांनी दावा केला की इराण-समर्थित दहशतवादी गटाचा प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह या मुख्यालयात होता. या हल्ल्यामुळे हेजबोलाबरोबरील संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, Axios ने दिलेल्या वृत्तानुसार, हेजबोलाचा नेता हसन नसराल्लाह हा या स्ट्राइकचा लक्ष्य होता. त्यामुळे या हल्ल्यात तो ठार झालाय की नाही याची माहिती घेतली जात आहे.

हेजबोलाच्या मुख्यालयावर अचूक स्ट्राईक

इस्रायली सैन्याने जाहीर केले की त्यांनी हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर “अचूक स्ट्राइक” केले. या हल्ल्यात कमीतकमी सहा इमारती नष्ट झाल्या असून यामुळे इराण-समर्थित गटाशी संघर्षात मोठी वाढ झाली. किमान दोन जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा >> “लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?

नसराल्लाहचा मृत्यू की जिवंत?

हेजबोलाच्या एका सूत्राने दावा केला की नसराल्लाह जिवंत आहे. तर इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेनेही त्याच्या सुरक्षिततेचा अहवाल दिला आहे. परंतु, इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की नसराल्लाहविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.

एअर स्ट्राईकमुळे जीवित आणि वित्त हानी

हेजबोलाच्या अल-मनार टेलिव्हिजनने वृत्त दिले की चार इमारती उद्ध्वस्त झाल्या, स्ट्राइकमुळे अनेक जीवितहानी झाली. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक इमारती ढिगाऱ्याखाली गेल्या, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेस सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील घरे हादरली.

“काही क्षणांपूर्वी, इस्रायल संरक्षण दलांनी हेजबोला दहशतवादी संघटनेच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राइक करण्यात आला. आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक कारवाई केली. जेणेकरून इस्रायली कुटुंबे त्यांच्या घरात, सुरक्षितपणे राहू शकतील”, असं IDF चे प्रवक्ते डॅनियल हगरी म्हणाले.