शनिवारी हमासनं गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर शेकडो रॉकेट्स डागली आणि युद्धाला सुरुवात झाली. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांना इस्रायलनंही सडेतोड उत्तर देत गाझा पट्टीक हवाई हल्ले सुरू केले. मोठमोठे रॉकेट्स गाझा पट्टीत पडू लागल्यानंतर तिथे रेड सायरन जारी करण्यात आला. आत्तापर्यंत या युद्धात शेकडो नागरिकांचा बळी गेला असून असंख्य इस्रायली स्त्रियांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. अमेरिका, भारत, कॅनडा यासारख्या जगातील अनेक मोठ्या देशांनी इस्रायलला हवी ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली असली, तरी इस्रायलनं मात्र आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नसल्याचं नमूद केलं आहे.

इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. इतर देशांकडून आपल्याला मदतीसाठी आश्वस्त करण्यात आलं असलं, तरी इस्रायल आपली लढाई स्वत: करण्यासाठी सक्षम आहे, असं नाओर गिलोन यांनी माध्यमांना सांगितलं.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
mindset of a rapist, rapist, mindset,
बलात्कारी मानसिकता कशी असते? कशी घडते?
Rape on Minor Girl
Crime News : “मावशी, बलात्कार म्हणजे काय?”, अल्पवयीन पीडितेने सामूहिक बलात्काराच्या दोन दिवस आधी विचारला होता प्रश्न

“आम्ही कधीच कुणाला सांगितलं नाही की…”

अमेरिकेकडून शस्त्रसाहित्याची मदत होत असल्याचं गिलोन यांनी यावेळी स्पष्ट केलं. “इस्रायलनं कधीच कुणाला असं सांगितलं नाही की तुम्ही येऊन आमच्यासाठी लढा. आम्ही आमचं युद्ध स्वत: लढतो. इतरांनी आमच्यासाठी लढा द्यावा अशी आमची इच्छा नाही. हे खरंय की अमेरिका आम्हाला लष्करी साहित्याच्या बाबतीत मदत करते आहे. पण आम्ही एकत्रच त्याचं उत्पादन आणि संशोधन करत असल्यामुळे ते ही मदत करत आहेत. या युद्धात आम्हाला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. आम्ही हे युद्ध स्वत: लढू शकतो. हे करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत”, असं गिलोन यांनी स्पष्ट कलं.

“भारताकडून आम्हाला मदतीसंदर्भात आश्वासन देण्यात आलं आहे. पण आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमचा लढा स्वत: देऊ”, असंही गिलोन यावेळी म्हणाले.

…आणि गिलोन यांनी सांगितली महत्त्वाची अडचण!

दरम्यान, हमासला संपवणं इस्रायलसाठी कठीण नसून इस्रायलसमोर दुसरीच महत्त्वाची अडचण आहे, असं गिलोन यांनी यावेळी सांगितलं. “आम्ही छोटा देश असलो, तरी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. आम्ही कोणत्याही मदतीची कुणाकडून मागणी केलेली नाही. युद्धसामग्री ही आमची समस्या नाहीये. आमची समस्या ही आहे की आम्ही अशा लोकांच्या विरोधात लढतोय ज्यांना युद्धात कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याची कोणतीही भीती वाटत नाही. ते महिला व लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. ही खरी समस्या आहे”, अशा शब्दांत गिलोन यांनी इस्रायलची अडचण स्पष्ट केली.

इस्रायल-हमास युद्ध निर्णायक वळणावर? अमेरिकेच्या युद्धनौका गाझाच्या दिशेने रवाना; जो बायडेन यांनी स्पष्ट केली भूमिका…

“हमाससारख्या संघटनांना अद्दल घडवण्यासाठी इस्रायलकडे अमर्याद क्षमता आहेत. असं करण्यापासून आम्हाला एकच गोष्ट अडवतेय. पण ती हमास नाही. हमासच्या आसपास असणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणताही धक्का लागू नये, ही आमची भूमिका आहे. हमास त्यांच्या लोकांची अजिबात काळजी करत नाही. कारण त्यांच्यासाठी हे लोक म्हणजे इस्रायलविरोधातलं एक शस्त्रच आहेत”, असं नाओर गिलोन यांनी स्पष्ट केलं.