Israel – Palestine News in Marathi: गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल व हमास यांच्यात घमासान युद्ध चालू असल्याचं दिसत आहे. शनिवारी सकाळी हमासनं शेकडो रॉकेट्स गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर डागली. यापाठोपाठ इस्रायलनं युद्धाची घोषणा करत हमासवर कडवा प्रतिहल्ला चढवला. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले असून असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. हमासचे दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले असून इस्रायली महिलांचं अपहरण करत आहेत. त्यामुळे जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर इस्रायलनं हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यापाठोपाठ आता इस्रायलनं मोठा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण नाकाबंदीचं हत्यार!

हमासनं इस्रायलवर रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्रायलच्या हवाई दलानंही गाझा पट्टीतील तळांवर हवाई हल्ले सुरू केले. मात्र, त्यापाठोपाठ आता इस्रायलनं सपूर्ण नाकेबंदीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे हमासची गाझा पट्टीत चांगलीच कोंडी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट

नेमकं काय घडतंय?

इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी गाझा पट्टीत संपूर्ण नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. आत्ताही गाझा पट्टीत बहुतांश भागात वीज गायब झाली आहे. पण आता संपूर्ण गाझा पट्टीत वीज बंद होईल. तिथला अन्नधान्य पुरवठा इस्रायलकडून बंद केला जाईल. तिथे कोणत्याही प्रकारचं इंधन पुरवलं जाणार नाही. आम्ही मानवी पशूंशी लढा देत आहोत. त्यामुळे आता त्याच पद्धतीने आमची कृती राहील”, असं गॅलंट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हजारोंच्या संख्येनं इस्रायलमध्ये फिरणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. ते सर्वजण इस्रायलमध्ये असताना मागे गाझा पट्टीत त्यांच्या आप्तस्वकीयांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

२००७ सालापासून काही प्रमाणात निर्बंध लागू

दरम्यान, गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींच्या सरकारवर याआधीपासूनच काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २००७ साली हमासनं गाझा पट्टीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हापासून इस्राएल व इजिप्त यांनी गाझावर अनेक निर्बंध लादले होते. आता इस्रायलनं गाझावर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Video: इस्रायलनं सांगितली हमासला संपवण्यातली अडचण; म्हणे, “आमची एकच समस्या आहे, ती म्हणजे…

नुकसान किती?

इस्रायल व हमास या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमुळे वित्तहानी नेमकी किती झाली हे युद्ध संपल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. पण मृतांचा आकडा मात्र रोज वाढत असल्याचं दिसत आहे. एका आकडेवारीनुसार आत्तापर्यंत या युद्धात दोन्ही बाजूचे मिळून तब्बल ११०० मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. इस्रायलमध्येच ७०० नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. त्याशिवाय, मृतांमध्ये ४४ सैनिकांचाही समावेश आहे. दुसरीकडे गाझा पट्टीत किमान ४०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

इस्रायलनं ताबा पुन्हा घेतला!

दरम्यान, घुसखोरी केल्यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलच्या ज्या ज्या भागात अत्याचार करत हिंडत होते, ते भाग या दहशतवाद्यांकडून पुन्हा मिळवण्यात इस्रायलला यश आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.