Hassan Nasrallah Killed in Israel Air Strike : इस्रायलने दक्षिण बैरुतमधील हेझबोलाच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा प्रमुख हसन नरसल्ला ठारा झाला. त्यानंतर आपले हल्ले सुरूच राहणार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले होते. त्यानुसार, शनिवारी इस्रायली सैन्याने बैरुतवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यामध्ये नबिल कौक ठार झाला. दरम्यान या हल्ल्यांसाठी अमेरिकन निर्मित मार्गदर्शित शस्त्रे ९०० किलो वजनाचा बॉम्ब वापरण्यात आल्याचा दावा अमेरिकन सिनेटर मार्क केली यांनी रविवारी केला. मार्क केली हे सिनेट सशस्त्र सेवा एअरलँड उपसमितीचे अध्यक्ष आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नसरल्लाहच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या ९०० किलोचा बॉम्ब हा मार्क ८४ मालिकेतील बॉम्ब आहे, असं वृत्तसंस्था रॉयटर्सने मार्क केली यांच्या हवाल्याने सांगितले. अमेरिका हा इस्रायलचा सर्वांत मोठा शस्त्रास्तर पुरवठादार आहे. इस्रायल हमास युद्ध सुरू झाल्यापासून अेमरिकेतून मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा केला जातोय. व्हाईट हाऊसने नोंदवले की इस्रायलने त्यांना बेरुतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली नव्हती. इस्रायली विमाने हवेत आहेत, याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एकदाच माहिती देण्यात आली होती.
गेल्या आठवड्याभरात इस्रायलने हेजबोलाविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. त्यामुळे हसन नसराल्लहासह सात प्रमुख नेते या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दक्षिण इस्रायलवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये हेजबोलाने हमासबरोबर सैन्यांत सामील झाली होती. त्यामुळे इस्रायलने हेजबोलालाही लक्ष्य केलं होतं. मारला गेलेला नाबिल कौक हा एक अनुभवी कमांडर होता. तो १९८० च्या दशकात हेजबोलामध्ये सामील झाला होता. तर, नसराल्लाहचा संभाव्य उत्तराधिकारी मानला जात होता.
हेजबोलाने उत्तर इस्रायलवरील रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. मात्र, त्यापैकी बहुसंख्य रॉकेट, क्षेपणास्त्रे आधीच नष्ट करण्यात आली किंवा ती निर्मनुष्य जागेत पडली.
अमेरिकेच्या हल्ल्यात सीरियात ३७ अतिरेकी ठार
सीरियामध्ये केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंधित ३७ अतिरेकी ठार झाल्याची माहिती अमेरिकेच्या लष्कराने रविवारी दिली. हे हल्ले १६ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला करण्यात आले. मृतांमध्ये दोन महत्त्वाच्या अतिरेक्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.