मुंबईत दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर ए तैयबावर इस्रायलने बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेला घातक म्हणत त्यांनी दहशतवादी संघटनाच्या इस्रायली यादीत समावेश केला आहे. भारतातील इस्रायल दूतावासाने याबाबतची माहिती दिली.

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईच्या ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेने हल्ले चढवले होते. यामध्ये शेकडो नागरिकांचे प्राण गेले, तर कोट्यवधींची वित्तहानी झाली होती. या घटनेचे पडसाद जगभरातून उमटले होते. या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांच्या काळजातून अद्यापही सुकलेल्या नाहीत. यंदा या घटनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इस्रायलने त्यांच्या देशाने तयार केलेल्या दहशतवादी संघटनेच्या यादी टाकलं आहे. याबाबतची माहिती भारतातील इस्रायल दूतावासाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

Afghan National Arrested For Illegally Staying In India For 17 Years
भारतात १७ वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
israel hamas ceasefire
इस्रायल-हमास युद्धविराम करार काय आहे? सुटका करण्यात येणारे ३३ ओलीस कोण आहेत? याचा अर्थ युद्ध आता संपेल का?
Israel war loksatta news
अखेर युद्धविराम, १५ महिन्यांनंतर गाझामध्ये शांतता नांदणार
Israel Hamas Ceasefire news Latest Update
Israel Hamas Ceasefire : युद्धविरामास इस्रायलच्या संरक्षण विभागाची मंजुरी; ओलिसांची सुटका कधी? संघर्ष कधी थांबणार?
Israeli security cabinet approves ceasefire deal with hamas
युद्धविरामावर शिक्कामोर्तब; इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळामध्ये कराराला मंजुरी
israeli airstrikes in gaza kill 72 as ceasefire delayed
गाझामध्ये शांतता नांदणार? शस्त्रसंधीनंतरही ७२ ठार; कराराला इस्रायलकडून मंजुरी अद्याप बाकी
loksatta editorial on ceasefire between israel and hamas
अग्रलेख : मर्दुमकीच्या मर्यादा

भारताप्रमाणेच इस्रायलही त्यांच्या सीमेच्या आत आणि आसपासच्या भागात सक्रियपणे कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांची यादी तयार करतो. या यादीला यूएस स्टेट डिपार्टमेंटने जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे.

लष्कर ए तैयबा ही एक प्राणघातक आणि निंदनीय दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने शेकडो भारतीय नागरिकांचे प्राण घेतले आहेत. शेकडो भारतीयांच्या हत्येसाठी ही संघटना जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी या संघटनेने केली घृणास्पद कृत्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

Story img Loader